balasaheb patil udaysinh patil undalkar 
महाराष्ट्र

DCC त उदयनराजे सुटले; सहकारमंत्र्यांपुढे उंडाळकरांचे आव्हान

विलासकाकांच्या पश्चात मतदारसंघ राखण्यासाठी त्यांचे चिंरजीव उदयसिंह पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Siddharth Latkar

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतून विद्यमान संचालक आणि भाजपचे आमदार जयकुमार गाेरे यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही अर्ज मागे घेतल्याने या बॅंकेच्या निवडणुकीत विराेधी पॅनल राहणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. दरम्यान सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्ज ठेवल्याने उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्याशी त्यांची लढत हाेईल. satara dcc bank election 2021 shashikant shinde balasaheb patil jaykumar gore political news

जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी आज (बुधवार) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हाेता. खासदार उदयनराजे भाेसले यांच्या विराेधातील अर्ज मागे घेतल्याने राजे जिल्हा बॅंकेत पुन्हा एकदा बिनविराेध निवडून गेले आहेत. त्यांच्यापाठाेपाठ त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले हे देखील बिनविराेध झाले आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मात्र त्यांचा अर्ज क-हाड प्राथमिक कृषी पतपुरवठा गटात ठेवला आहे. हा मतदारसंघ पुर्वीपासून माझे वडील (कै.) विलास काकांचा असल्याने मी या मतदारसंघातून लढावे अशी समर्थकांची इच्छा असल्याने उदयसिंह पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही. त्यामुळे आता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि ॲड. उदयसिंह पाटील यांच्यात टक्कर हाेणार असल्याने मतदारांची पुन्हा एकदा दिवाळी हाेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

या बँकेची निवडणूक जाहीर हाेताच सत्ताधारी गटाबराेबरच विरोधकांनी पॅनल उभे करण्याची तयारी केली हाेती. त्यामध्ये आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अग्रेसर हाेते. ओबसी, फलटण सोसायटी, विमुक्त भटक्या जाती या गटातून देखईल समर्थकांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. आज या सर्वांनी आपआपले अर्ज मागे घेतल्याने बॅंकेच्या निवडणुकीत विरोधी पॅनल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

Meningitis Symptoms : जास्त डोकेदुखी धोकादायक! ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

Panvel Election: पनवेल विधानसभेत ८५ हजार दुबार मतदार, खोपोलीनंतर पनवेलमधील घोळ उघड

School Holiday : मुसळधार पावसाचा अलर्ट! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूरमधील शाळांना उद्या सुट्टी

SCROLL FOR NEXT