crime news 
महाराष्ट्र

साता-यातून पळून गेलेले ते दाेघे अडकले पाेलिसांच्या जाळ्यात

ओंकार कदम

crime news सातारा : सातारा जिल्ह्यात फलटण, कोरेगाव ,खंडाळा, वाई, जावली या तालुक्यातील विद्युत डीपी चोरी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे पथकाने लावला. या प्रकरणी संशयित फरारी आराेपी विजय उर्फ मुंजेश काळे आणि मर्द रमेश भोसले या दाेघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या दाेन्ही संशयित आराेपींकडून डीपी चोरी प्रकरणात 27 गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत २४ गुन्ह्यांतील ६५ किलो तांब्याची तार हस्तगत करण्यात आली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुमारे ७६ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल आहे. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या दाेन्ही संशयित आराेपींवर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. तसेच तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात पाेलिसांना यश आले आहे. दरम्यान विद्युत मंडळाच्या डीपी चाेरी प्रकरणी फरारी अटक झाल्याने आणखी काही प्रकरणे बाहेर येतील असा अंदाज व्यक्त हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त | VIDEO

Constant Stomach Pain : सतत पोटोत दुखतंय? होऊ शकतात हे गंभीर आजार

Railway: आता जनरल डब्यात मिळणार लगेच सीट, प्रवाशांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Beed Crime : व्हिडिओ व्हायरल का केला?, जाब विचारणाऱ्या मित्राचेच बोटे छाटली; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Malegaon Bomb Blast: साध्वी प्रज्ञा सिंह- कर्नल पुरोहितसह निर्दोष सुटलेले ते ७ आरोपी नेमके कोण?

SCROLL FOR NEXT