man Taluka Andhali Crime News Saamtv
महाराष्ट्र

Satara Crime: साताऱ्याच्या माण तालुक्यात दुहेरी हत्याकांड; धारदार शस्त्राने वार करत पती- पत्नीचा निर्घृण खून

man Taluka Andhali Crime News: माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याने खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

ओंकार कदम, प्रतिनिधी

Satara Crime News:

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील (Satara) माण तालुक्याच्या (Man Taluka) आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याने खळबळ उडाली आहे. गावातील संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार यांचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून खून केला.

पती- पत्नी दोघेही पवार दरा येथे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री दहानंतर विद्युत पंप सुरु करण्यास आले होते. रात्री दहा ते अकराच्या दरम्यान अज्ञाताने धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून या दाम्पत्याची निर्घृण हत्या केली. सकाळी दोघांचेही मृतदेह शेतात आढळले ज्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.

दोघांच्याही डोक्यात, मानेवर,धारदार शस्त्राने वार करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या निर्घृण हत्येमागचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. इतक्या भयंकरपणे पती- पत्नीची हत्या केल्याने संपूर्ण माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT