Satara Crime Saam tv
महाराष्ट्र

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Satara News : चोरीची घटना मे महिन्यामध्ये घडली होती. याबाबत तक्रार संबंधित मालकाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात तपास करताना घरकाम करणाऱ्या महिलेची पोलिसांनी विचारपूस केली

ओंकार कदम

सातारा : घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाचा विश्वघत करत घरातून साधारण १० तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शाहूपुरी येथे घडली होती. मी महिन्यात घडलेल्या या घटनेचा तपास करताना घरकाम करणाऱ्या महिलेने दागिन्यांची चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडून साधारण ९ लाख ६० हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. 

साताऱ्याच्या शाहूपुरी येथे दागिने चोरीच्या घटनेत सीमा कोकरे असे अटक केलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेचे नाव आहे. दरम्यान चोरीची घटना मे महिन्यामध्ये घडली होती. याबाबत तक्रार संबंधित मालकाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात तपास करताना घरकाम करणाऱ्या महिलेची पोलिसांनी विचारपूस केली असता महिलेने सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांना तिच्यावर संशय होता. 

महिलेला अटक करत दागिने केले हस्तगत 

मात्र पोलिसांच्या कौशल्य पूर्ण तपासामध्ये महिलेची सखोल चौकशी केली. यात संबंधित महिलेने चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी तिच्याकडून ९ लाख ६० हजारांचे सोने हस्तगत केले आहे. 

नाशिकमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
नाशिक
: रस्त्यात चालणाऱ्या लोकांच्या हातातून मोबाईल हिसकून चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्या कडून चोरी केलेले महागडे मोबाईल फोनसह रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. मोबाईल चोरीसाठी हे चोरटे रिक्षाचा वापर करत होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी या टोळी करून दोन लाख ९० हजार रुपये किमतीच मुद्देमालसह तिघांना ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॉगलचे राजकारण सोलापुरातून संपलं; मंत्री जय कुमार गोरेंची मार्मिक टीका|VIDEO

Maharashtra News Live Update: कौडण्यपूरच्या रुख्मिणी मातेच्या पालखीचे अमरावती मध्ये जंगी स्वागत

खासदार-आमदारांच्या फुटीनंतर आता अध्यक्षपद गेलं; राज्यातील राजकारणात मोठी घडामोड

एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; 2029 साठी उमेदवार जाहीर|VIDEO

Ratnagiri Tourism : कोकणातील पावसाळी जादू! रत्नागिरीतील 'ही' ५ ठिकाणे फिरायला अजिबात विसरू नका

SCROLL FOR NEXT