Whale Vomit Smuggling NEWS Saam tv
महाराष्ट्र

Whale Vomit Smuggling: वन विभागाची मोठी कारवाई; व्हेल मासा उलटी तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी उपनगराध्यक्षांसह चौघे गजाआड

Whale Vomit Smuggling: साताऱ्यात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. साताऱ्यात महाबळेश्वर व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणी वन विभागाने मोठी कारवाई केली आहे.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

Satara Whale Vomit Smuggling Case:

साताऱ्यात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. साताऱ्यात महाबळेश्वर व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणी वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील महाबळेश्वर येथे माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह तिघांविरोधात सातारा वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रेंज फॉरेस्ट ऑफिसर महांगडे यांनी ही कारवाई केली आहे.

वन विभागाकडून रात्री एक वाजता व्हेल माशाच्या तस्करीचा मुद्देमाल छापा टाकून जप्त करण्यात आला. या प्रकरणात महाबळेश्वरच्या माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह एकूण चार जणांना अटक करण्यात आली.

सात दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, मुंबई पोलिसांनी काही दिवसांआधी महाबळेश्वरच्या जंगलातील वाघाच्या कातडी तस्करी प्रकरणी मोठी कारवाई केली होती. मुंबई पोलिसांनी वाघाची कातडी आणि नखांच्या तस्करी प्रकरणी तीन जणांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.

नाशकात मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला

नाशिकच्या पंचवटी परिसरातील हनुमान मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्याने कृष्ण मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरून नेला आहे. ही घटना नाशिकच्या पंचवटी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरात पाच दिवसांपूर्वी घडली.

मंदिरातील मुकुट चोरी करणाऱ्या संशयिताच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या होत्या. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेच्या आधारावर पंचवटी पोलिसांनी (Police) चोरट्याला लागलीच अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT