Satara Crime Saam tv
महाराष्ट्र

Satara Crime : धक्कादायक.. कर्ज देत नसल्याचा राग; बँकेत जात मॅनेजरवर कोयत्याने वार

Satara News : आशुतोष सातपुते यांनी शेळी पालनासाठी बँकेकडे अर्ज केला होता. मात्र व्यवसायासाठी वश्यक कर्ज देत नाही.

संभाजी थोरात

सातारा : व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण टाकले होते. मात्र बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने संतापाच्या भरात थेट बँकेत जाऊन बँक मॅनेजरवर कोयत्याने वार केले. हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील कराडमधील इंडियन ओवरसीज बँकेत घडला आहे. 

सातारा (Satara) जिल्ह्यातील इंडियन ओवरसीस बँकेच्या कराड शाखेचे बँक मॅनेजर आशिष कश्यप यांच्यावर रेठरे बुद्रुक येथील आशुतोष दिलीप सातपुते याने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशुतोष सातपुते यांनी शेळी पालनासाठी बँकेकडे अर्ज केला होता. मात्र व्यवसायासाठी कश्यप कर्ज देत नाही. याचा राग मनात धरून जिवंत ठेवणार नाही; असे म्हणत आशुतोष याने बँक मॅनेजर कश्यप यांच्यावर सशस्त्र हल्ला (Crime News) केला. यात बँक मॅनेजर कश्यप हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. 

दरम्यान घटनेनंतर जखमी बँक मॅनेजर कश्यप यांच्यावर कराडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बँकेचे मॅनेजर हे मूळ बिहार राज्यातील असून हल्लेखोर हा कराड तालुक्यातील आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT