Satara 28 Crime News Saam TV
महाराष्ट्र

Satara Crime News: साताऱ्यात आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार, ५ जणांवर गुन्हा दाखल

Satara Crime News: कोळसा कारखान्यात एका आदिवासी महिलेवर ५ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

ओंकार कदम

Satara Crime News: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कोळसा कारखान्यात एका आदिवासी महिलेवर ५ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. १५ दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे पीडित महिलेने आपल्या जबाबात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय पीडित महिला मूळ रायगड (Raigad News) जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रहिवाशी असून ती कामानिमित्त आपल्या पती सासरा आणि मुलांसह सातारा (Satara News) येथे आली होती. पीडिता आणि तिचा पती फलटण तालुक्यातील सोनवडी बुद्रुक येथील कोळशाच्या कारखान्यात काम करतात.

१५ दिवसांपूर्वी कारखान्यात काम करत असताना आपल्यावर मालकासह पाच जणांनी बलात्कार (Crime News) केला, अशी तक्रार पीडितेने पोलिसात दाखल केली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूर नगरपालिका निवडणुकीत 58.30 % मतदान

SCROLL FOR NEXT