Satara Crime  Saamtv
महाराष्ट्र

Satara Crime News: मध्यरात्री रंगला सिनेस्टाईल थरार! पाठलाग करत ७ किलो सोन्या चांदीच्या विटा लंपास; साताऱ्यात खळबळ

हे पिकअप कोल्हापूरहुन पुण्याच्या दिशेने जात असताना बोरगावच्या हद्दीत हा प्रकार घडला.

Gangappa Pujari

ओंकार कदम, प्रतिनिधी...

Satara Crime: सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्याच्या बोरगाव हद्दीत कुरीयर घेवून जाणारी पीकअप गाडी लुटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यावेळी गाडीतून सात किलो वजनाच्या सोन्याच्या आणि चांदीच्या विटा चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारच्या (Satara) बोरगाव हद्दीत कुरिअर घेऊन जाणारी पिकअप गाडी अज्ञातांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे पिकअप कोल्हापूरहुन पुण्याच्या दिशेने जात असताना बोरगावच्या हद्दीत हा प्रकार घडला. मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी ही लुट केली. (Latest Marathi News)

लुटारूंचा पाठलाग करत असताना पोलिसांना पीकअप गाडी सापडली. मात्र सोने-चांदी घेऊन चोर इनोव्हा कार आणि दुचाकीवरून फरार झाले होते. या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी दोन आरोपींना पकडल्याचेही सांगण्यात येत आहे.

बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ...

बीड (Beed) जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस ठाणे असलेल्या नेकनूर शहरातच चोरट्यांनी दहशत निर्माण केल्याचे समोर आले आहे. शहरात एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT