Gunratna Sadavarte saam tv
महाराष्ट्र

Satara: मोठी बातमी; गुणरत्न सदावर्तेंना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

आज सदावर्तेंना सातारा न्यायालयात हजर केले हाेते.

ओंकार कदम

सातारा : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपात गुरुवारी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांना आज (शुक्रवार) सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दाेन्ही बाजूने जाेरदार युक्तीवाद झाला. न्यायाधिश श्री. शेंडगे यांनी सदावर्तेंना १८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (gunratna sadavarte latest marathi update). आज सकाळी सव्वा अकरा वाजता सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश श्री. शेंडगे यांच्या समाेर गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले हाेते.

खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत अपशब्द वापरुन सदावर्ते यांनी टीका केली हाेती. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधाने केली हाेती. मराठा आरक्षणालाही त्यांचा विराेध हाेता. सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्याने स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी त्यांच्या विराेधात सन २०२० मध्ये सातारा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्या प्रकरणी त्यांना गुरुवारी सातारा पाेलिसांनी ताब्यात घेतलं हाेते. आज त्यांना न्यायालयात हजर केले हाेते.

दाेन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायाधिश शेंडगे यांनी सदावर्ते यांना तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Rings Designs : हातांच्या सौंदर्यात पडेल भर! घागरा चोळीवर खुलून दिसतील 'या' ७ स्टायलिश रिंग्स

Hair Care: केस लगेच फ्रिझी होतात? मग वापरा या ७ सोप्या टिप्स; केस होतील मऊ, मुलायम आणि चमकदार

Maharashtra News Live Update : महायुतीत एकनाथ शिंदे पुन्हा नाराज

DA Hike Calculation: DA वर आयकर लागतो का? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Property News: अनधिकृत बांधकामांवर फडणवीस सरकारचा मोठा प्रहार; घेतला मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई

SCROLL FOR NEXT