Satara: युक्तीवाद पूर्ण; गुणरत्न सदावर्तेंना साता-यात जेल की बेल?

आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले.
gunratna sadavarte
gunratna sadavartesaam tv
Published On

सातारा : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपात गुरुवारी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांना आज (शुक्रवार) सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दाेन्ही बाजूने जाेरदार युक्तीवाद झाला असून थाेड्याच वेळात सदावर्तेंना जेल की बेल हे समजणार आहे. (gunratna sadavarte latest marathi update)

आज सकाळी सव्वा अकरा वाजता सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश श्री. शेंडगे यांच्या समाेर गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले हाेते.

मराठा समाजातील (maratha community) कार्यकर्त्यांनी गुरुवारी सदावर्ते यांच्या विराेधात सातारा (satara) पाेलीस ठाणे येथे घाेषणाबाजी केल्याने आज शहर पाेलीस ठाणे आणि न्यायालय परिसरात माेठा पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

gunratna sadavarte
Atpadi: विना परवाना ज्योतिबा फुलेंचा बसविला पुतळा; ४३ जणांवर गुन्हा दाखल

आज न्यायाधिश शेंडगे यांच्या समाेर सदावर्ते यांना शहर पाेलिसांनी हजर केले. सरकारी वकील अंजुम पठाण यांनी तपासाच्या दृष्टीने सदावर्ते यांना १४ दिवसांची पाेलीस काेठडी द्यावी अशी मागणी न्यायाधिशांना केली. यावेळी पठाण म्हणाल्या ते (सदावर्ते) स्वतः वकील आहेत. त्यांना माहित आहे त्यांच्या बोलण्यामुळे काय होऊ शकते. त्यामुळे ते कुणाच्या सांगण्यावरून बोलले हे तपासणे गरजेचे आहे. त्यांच्या बोलण्यावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. तपासाच्या दृष्टीने त्यांना १४ दिवसांची काेठडी द्यावी अशी मागणी वकील पठाण यांनी केली.

gunratna sadavarte
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

सदावर्ते यांच्यावतीने सचिन थोरात, सतीश सुर्यवंशी आणि प्रदीप डोरे यांनी युक्तीवाद केला. या गुन्ह्यात काेणत्याही प्रकराची रिकव्हरी नाही. तसेच एका वृत्तवाहिनीवर डिबेट चालू हाेते. संबंधित तक्रारी ही ऐकीव आहे. फिर्यादी तेथे उपस्थित नव्हते. सदावर्ते यांना पाेलिसांनी ताब्यात घेणे हे कायद्यात बसत नाही. ४१ नाेटीसचा कालावधी संपला आहे असे नमूद केले.

दरम्यान सदावर्ते यांनी देखील स्वत:ची बाजू मांडताना काही मुद्दे उपस्थित करताच सरकारी वकील पठाण यांनी संबंधित मुद्दे खाेडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदावर्ते बाेलतच राहिल्याने काही काळ शाब्दािक खडाजंगी झाली. यावेळी पठाण यांनी अन्य गुन्ह्याबद्दल काय झाले ते येथे सांगू नये असे म्हटलं.

सदावर्ते यांच्या वकीलांनी याचे गांभीर्य पोलिसांना होते तर गेली दाेन वर्ष पोलिसांनी काय केले असा प्रश्न उपस्थित करुन या पाठीमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा दावा केला. सदावर्ते यांनी स्वतःचे मत मांडले हाेते. त्याचा विपर्यास केला गेला आहे. या आराेपांमध्ये काही तथ्य नाही. त्यामुळे सदावर्ते यांना पाेलीस काेठडीचे आवश्यकता नाही असे म्हणणे मांडले.

सातारा आणि काेल्हापूरची गादी सर्वांनाच आदरणीय आहे. संभाजीराजे आणि ते (सदावर्ते) काैटुंबिक मित्र आहेत. त्यांच्याबराेबर उठ बस असती. दरम्यान हे बाेलत असताना सदावर्ते यांच्या वकीलांनी संभाजी भाेसले असे म्हटल्याने सरकारी वकील पठाण यांनी आक्षेप घेताच वकीलांनी माफी मागत शब्द घेतल्याचे न्यायाधिशांना सांगितलं. यावेळी पठाण यांनी न्यायालयाने चुकीचा शब्द वापरला गेल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा असे म्हटलं.

दरम्यान दाेन्ही बाजूंचा युक्तीवाद पुर्ण झाला असून थाेड्याच वेळेत सदावर्ते यांना जेल की बेल हे समजणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com