Satara Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Satara Accident News: कामावरुन घरी निघालेल्या तरुणाला मृत्यूने रस्त्यातचं गाठलं; भलंमोठं झाड बाईकवर कोसळून अपघात

Satara News : वाई तालुक्यातील जोर रस्त्यावर एकसर गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

ओंकार कदम

Satara News: राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. साताऱ्यातील वाईमध्येही भलंमोठं झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे.

वाई तालुक्यातील जोर रस्त्यावर एकसर गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अचानक करंजाचे झाड दुचाकीवर पडल्याने दुचाकीस्वार सोमनाथ प्रदीप रोकडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

सोमनाथ हा सातारा तालुक्यातील नानेगाव येथील आहे, मात्र तो सध्या वाईतील फुलेनगर येथे राहत होता. या अपघातात सुरेखा बडे ही महिला जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Accident News)

सोमनाथ आणि सुरेख हे दोघेही वाई औद्योगिक वसाहतीत एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. सोमनाथ हा सुरेखा बडे यांना घरी सोडण्यासाठी चिखलीला जात असताना अचानक हे झाड त्यांच्या अंगावर कोसळले आणि ही दुर्घटना घडली. रस्त्यावर झाड आडवे पडल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने काही वेळातच झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइननेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT