Car falls Into Venna River Saam Tv
महाराष्ट्र

Satara News: सातारा-महाबळेश्वर रोडवर भीषण अपघात; भरधाव कार वेण्णा नदीत कोसळली, एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी VIDEO

Car falls Into Venna River On Satara Mahabaleshwar Road 4 Injured: सातारा-महाबळेश्वर रोडवर भीषण अपघात झालाय. भरधाव कार वेण्णा नदीत कोसळली.

Rohini Gudaghe

ओंकार कदम, साम टीव्ही सातारा

सातारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सातारा-महाबळेश्वर रोडवरील वेण्णा नदीपात्रात कार कोसळली (Satara Mahabaleshwar Road) आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.

सातारा-महाबळेश्वर रोडवर भीषण अपघात

ही घटना आंबेघर गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. जखमींची नावे अद्याप समोर आलेली (Car falls Into Venna River ) नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली असावी, असा प्राथामिक अंदाज आहे.

भरधाव कार वेण्णा नदीत कोसळली

सातारा महाबळेश्वर रोडवर रात्री दहा वाजता आंबेघर गावच्या हद्दीत हा भीषण अपघात (Satara News) झालाय. यावेळी पुलावरून सातारच्या दिशेने येणारी कार पुलाचा कठडा तोडून थेट वेण्णा नदीमध्ये कोसळली. या घटनेत गाडीतील चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. भरधाव कार वेण्णा नदीत कोसळल्याचं समोर (Satara News) आलंय.

बारामतीतील अपघात

बारामती तालुक्यातील रूई गावाच्या हद्दीत देखील काल १६ जूलै रोजी संध्याकाळी भीषण अपघात (Road Accident) झालाय. या अपघातात इंदापूर तालुक्यातील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. आदित्य आबासाहेब निंबाळकर असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. त्याचे वडिल इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर असल्याची माहिती मिळतेय. गाडीचा टायर फुटल्याने गाडी पलटली. ती एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळल्यामुळे अपघात झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT