महाराष्ट्र

Dharashiv Bandh: सरपंच देशमुख हत्या प्रकरण; धाराशिव जिल्हा बंदची हाक, फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Dharashiv Bandh: संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या प्रकरणी आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

Bharat Jadhav

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राज्यभरात सरकारविरोधात संतपाची लाट पसरलीय. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. सरपंच हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती, आता धाराशिव जिल्हा बंदची हाक नागरिकांनी दिलीय.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ शिक्षा करण्यासह माजी मंत्री धनंजय मुंडे यांना या प्रकरणात आरोपी करावे. तीन महिन्यांपासून फरार आरोपी पकडण्यात अपयशी ठरलेले गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आरोपींना पाठिशी घालणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. धाराशिव,कळंब, भुम,परंडा,तुळजापूर सह जिल्ह्यात बंद ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांना केलेल्या अमानुष मारहाणीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतल नागरीकांच्या भावना दुखावल्या असुन त्यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT