Santosh Deshmukh Case  Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: 'वाल्मीक आणि त्याची लोकं मला मारून टाकतील', हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांनी व्यक्त केली होती भीती

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी वाल्मीक कराडबाबत भीती व्यक्त केली होती. संतोष देशमुखांच्या पत्नीने जबाबामध्ये ही धक्कादायक माहिती सांगितली.

Priya More

योगेश काशिद, बीड

'वाल्मीक कराड आणि त्याची लोकं मला मारुन टाकतील.', असं संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी आपल्या पत्नीला सांगितलं होतं. ही धक्कादायक माहिती दोषारोप पत्रातील अश्विनी देशमुख यांच्या जवाबातून समोर आली आहे. ८ डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चा देखील झाली होती. त्यानंतर ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

७ आणि ८ डिसेंबरला काय घडलं होतं? याचा उल्लेख अश्विनी देशमुख यांनी त्यांच्या जबाबामध्ये दिला आहे. सीआयडीच्या तपास अधिकारी किरण पाटील यांनी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवून घेतला. विष्णू चाटेचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख यांना आपल्या पत्नीला 'वाल्मीक कराड आणि त्याची लोकं मला मारुन टाकतील.', असे सांगितले होते.

संतोष देशमुख यांच्या पत्नीने जबाबामध्ये सांगितले की, विष्णु चाटेचा त्यांना फोन आला होता. 'तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मीक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही.' असं तो म्हणाला होता. विष्णू चाटेच्या फोनमुळे मला टेन्शन आलंय असं संतोष देशमुख यांनी पत्नीला सांगितलं होतं.

त्यावर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी त्यांना धीर दिला. 'तुम्ही कोणाचे वाईट केले नाही त्यामुळे तुमचे कोणी वाईट करणार नाही. उगाच काळजी करू नका तुम्ही पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार द्या.' असं अश्विनी देशमुखांनी सांगितले होते.

संतोष देशमुख यांनी तेव्हा पत्नीला म्हणाले होते की, 'तुला माहित नाही, तो वाल्मीक कराड हा गुंड आहे. त्याची राजकीय नेत्यासोबत उठबस आहे. तो आणि त्यांचे लोकं मला मारून मारून टाकतील.' असं शेवटचं प्रत्यक्ष संभाषण संतोष देशमुखांसोबत झालं होतं असं अश्विनी देशमुख यांच्या जबाबामध्ये नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT