Walmik karad SIT Custody in Beed Sarpanch Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराडला ७ दिवस SIT कोठडी; कोर्टात काय घडलं? एसआयटीनं सांगितल्या ९ गोष्टी

Walmik Karad News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या कोर्टात युक्तीवाद झाला. न्यायालयाने वाल्मीक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Yash Shirke

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या कोर्टात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने वाल्मीक कराडला ७ दिवसांची SIT कोठडी मिळाली आहे. २२ जानेवारीपर्यंत कराड SIT पोलीस कोठडीमध्ये राहणार आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर कराडला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या कोर्टात युक्तीवाद झाला. खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी एसआयडीने केली होती. युक्तीवादादरम्यान न्यायाधीशांसमोर एसआयटीने हत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. एसआयटीने कोर्टासमोर ९ बाबी मांडल्या.

संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी आरोपींनी कट रचला. अपहरणाआधी तीन आरोपींमध्ये फोनवरुन चर्चा झाली. १० मिनिटे त्यांचा फोनवर संवा सुरु होता. याशिवाय हत्येच्या दिवशी वाल्मीक कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती असे एसआयटीने सांगितले. हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण असल्याने आरोपींवर मकोका लावण्यात आला. एसआयटीच्या टीमने वाल्मीक कराडने केलेल्या गुन्ह्यांची यादी सादर केली.

बीड कोर्टातील सुनावणीसाठी न्यायाधीश, वकील आणि आरोपी उपस्थित होते. हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली याचा तपास घेण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची असल्याचे एसआयटीने सांगितले. आरोपींमधील चाटे, घुले आणि वाल्मीक कराड यांच्यामध्ये कसले संबंध आहेत याचाही तपास करायचा आहे असे एसआयटीने कोर्टासमोर सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT