Santosh Deshmukh Case  Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडची संपत्ती जप्त होणार, SIT कडून हालचालींना वेग; डिलीट केलेला मोबाइल डाटाही रिकव्हर

Walmik Karad Assets Will Be Seized: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. यासाठी एसआयटीने कोर्टात धाव घेतली आहे.

Priya More

योगेश काशीद, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. वाल्मीक कराडने आयफोनमधील डिलीट केलेला डेटा एसआयटीने रिकव्हर केला आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी टीमकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपीविरोधात दाखल झालेल्या दोषारोप पत्रातले काही महत्त्वाचे मुद्दे दुसऱ्या पत्रात समोर आले आहेत. हेच मुद्दे आता साम टीव्हीच्या हाती लागले आहेत. अडचणी वाढणारी ही माहिती धक्कादायक आहे. वाल्मीक कराडने हत्या प्रकरणानंतर आपल्या तीन आयफोनमधील डेटा डिलीट केला. हा डिलीट झालेला डेटा एसआयटीने रिकव्हर केला आहे.

आवादा एनर्जी प्रकल्प कंपनीकडे खंडणी मागतानाचे काही व्हिडिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले होते. या चित्रीत झालेल्या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले कंपनीकडे स्पष्टपणे दोन कोटींची खंडणी मागताना दिसत आहे. त्यात त्याने कराडचे नाव घेत खंडणी मागितली आहे. वाल्मीक कराडने डिलीट केलेला डेटा आता एसआयटीने रिकव्हर केला आहे.

एसआयटीने डिलीट केलेला डेटा रिकव्हर केल्यामुळे आता कराडच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे आणि हाच सबळ पुरावा ठरू शकतो. वाल्मीक कराडची महाराष्ट्रमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे. ही संपत्ती जप्त करण्यासाठी आता एसआयटीने न्यायालयाकडे अर्ज केला आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

वाल्मीक कराडकडे ८ आलिशान आणि महागड्या कार -

- मर्सिडीज बेन्झ MH44z0007

- बीएमडब्ल्यू Mh44Ac1717

- इनोव्हा टोयोटा, Mh44AB1717

-फोर्ड इंडेवर Mh44T0777

- अशोक लेलँड Mh44 u07700

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT