beed police officers transferred saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: बीड पोलिस दलातून मोठी बातमी, ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या

beed police officers transferred: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Priya More

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिस दलावर वेगवेगळे आरोप होत आहेत. अशामध्ये आता चार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे चर्चा होऊ लागल्या आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये केजचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील हे आता केज पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

पोलिस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार घेणार आहेत. तर पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी ४ मुख्य आरोपींपैकी ३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना ४ जानेवारीला पुण्यातून अटक करण्यात आली. पुण्यात एका व्यक्तीला भेटून पेसै घेण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आधीच विष्णू चाटे याला अटक करण्यात आली होती. आता कृष्णा आंधळे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे आरोपी घटना झाल्यापासून मोकाटच होते. या तिघांचा शोध सीआयडीचे १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी घेत होते. या व्यतिरिक्त बीड पोलिस दलातीलही ५ पथके या आरोपींचा शोध घेत होती. या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि विष्णू चाटे या ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर सध्या कृ्ष्णा आंधळे फरार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले; पण 'त्या' एका संशयाने सगळा डाव उधळला!

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

SCROLL FOR NEXT