Santosh Deshmukh Case  Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : अजित पवार आहेत कुठे? धनंजय मुंडे निशाण्यावर, पण पक्षाध्यक्षांचं मौन, VIDEO

Santosh Deshmukh Case update : संतोष देशमुख प्रकरणात विरोधकांकडून धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष केले जात आहे. यावर अजित पवारांचं मौन असल्याची चर्चा आहे. यावर आता संभाजीराजे यांनी भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अजित पवारांचे विश्वासू शिलेदार असलेले धनंजय मुंडे यांना चहूबाजूंनी लक्ष्य केले जात असताना अजित पवारांनी मौन बाळगल्याची चर्चा आहे. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे.

संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'अजित पवार या विषयावर गप्प का आहेत? ते बोलत का नाही? धनंजय मुंडे यांचे संरक्षण अजित पवार का करत आहेत? धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली. ते आम्हाला माहीत झालं पाहिजे. काल त्यांची चर्चा झाली. त्यानंतर आज शरण गेला. हा क्रम पाहिला तर प्रश्न निर्माण होतो. धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडला निरोप आला आहे का? सरेंडर हो, नाहीतर अडचण आहे. तो अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आला'.

'या प्रकरणात एवढं कनेक्शन असताना सीआयडीला पकडता आलं नाही. एवढं मन शुद्ध असताना आधीच सरेंडर का झाला नाही? एवढे २२ दिवस का लावले. त्यामुळे यात निश्चित गडबड आहे. याचा तपास होणे गरजेचे आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद झाला पाहिजे. तिथे मोक्का लावणे गरजेचे आहे. त्यानी म्हणावं, माझ्यावर खंडणीच्या गुन्ह्यात बेल मिळाली, आता असं चालणार नाही. यामुळे महाराष्ट्रात आक्रोश निर्माण झाला आहे. तो कोणी सहन करणार नाही. एवढीत संघटीत गुन्हेगारी सुरु आहे. बीडला ऐतिहासिक वारसा आहे. बीडला सांस्कृतिक वारसा आहे. पुरोगामी विचारांचा वारसा बीडला आहे. या प्रकरणात त्वरित कारवाई करा. तीन फरार आरोपींना पकडा. ते पण पुण्यात बसले आहेत का? असा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी केला.

'मुख्यमंत्री कार्यक्षम आहेत. त्यांच्याकडे अनेक कौशल्य आहेत. ते वकील आहेत. अनेक वर्ष गृहमंत्रिपद भुषवलं आहे. त्यांना काल धनंजय मुंडे भेटले. दोघांमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती पाहिजे. कराड तीन दिवस पुण्यात होता. ही बाब सीआयडीला माहिती नव्हती. बीडचं पालकमंत्री कोणी व्हावं. धनंजय मुंडे पालकमंत्री होऊन चालत नाही. त्यांनी लोकांना न्याय दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रिपद घेतलं तरी स्वागत करू, असे संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Barshi News : अतिवृष्टीत शेतीचे नुकसान; विवंचनेत शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, शासनाकडून कुटुंबीयांना मदतीची मागणी

Maharashtra Live News Update: शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाची आढावा बैठक सुरू

Nanded Rain : गोदावरी, असना नदीच्या पुराचे पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचा झाला चिखल

Pune Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT