Santosh Deshmukh Case Walmik Karad: Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: बीडचे पोलीस वाल्मिक कराडच्या दिमतीला; तृप्ती देसाईंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार

Santosh Deshmukh Case Walmik Karad: मकोकांतर्गत अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या दिमतीला बीडमधील २६ पोलिसांची गँग काम करतेय. कोण आहेत हे २६ पोलीस आणि कराडसाठी काय काम करतात त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकणातील मास्टरमाईंड असलेला आरोपी वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता बीडमध्ये कराडच्या मर्जीतील पोलीसांची टोळी असल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलाय.3 पोलीस उप अधीक्षकांसह तब्बल 26 पोलीसांची यादीच देसाईंनी जाहीर केलीय. या यादीत कुणाचा समावेश आहे? पाहूया.

कराडच्या पे रोलवर 26 पोलीस?

दिलीप गित्ते , पोलीस उप अधीक्षक

डापकर- पोलीस उप अधीक्षक

राजकुमार मुंडे, पोलीस उप अधीक्षक

प्रवीण बांगर, पोलीस निरीक्षक

घुगे, सहायक पोलीस निरीक्षक

बाळराजे दराडे, सहायक पोलीस निरीक्षक

रंगनाथ जगताप, सहायक पोलीस निरीक्षक

सुरेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक

संदीप दहिफळे, सहायक पोलीस निरीक्षक

संजय राठोड, अतिरिक्त पोलीस

भागवत शेलार, स्थानिक गुन्हे शाखा

सचिन सानप, स्थानिक गुन्हे शाखा

राजाभाऊ ओताडे, स्थानिक गुन्हे शाखा

त्रिंबक चोपने ,केज -पोलीस

कागने सतिश, पोलीस

बांगर बाबासाहेब, पोलीस

विष्णु फड ,पोलीस

शेख जमीर, पोलीस

चोवले, पोलीस

रवी केंद्रे, पोलीस

बापु राऊत, पोलीस

भास्कर केंद्रे, पोलीस

गोविंद भताने, पोलीस

विलास खरात, पोलीस

बाळा ढाकणे, पोलीस

अमोल गायकवाड, पोलीस ड्रायवर बीडमधील गुंडागर्दी रोखण्यासाठी यादी जाहीर केलेल्या पोलीसांची बदली करण्याची मागणीही देसाईंनी केलीय..

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीतील पोलीस अधिकारी हे वाल्मिकच्या मर्जीतील असल्याचा आरोप झाला. त्यानंतर सरकारवर एसआयटीतील अधिकारी बदलण्याची नामुष्की आली..त्यानंतर आता बीडमधील तब्बल 26 पोलीस वाल्मिक कराडच्या पे रोलवर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप होत असल्यामुळे त्यांच्याबाबत गृहमंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय़ घेतात याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT