Dhirendra Shastri Saamtv
महाराष्ट्र

Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींकडून संत तुकाराम महाराजांचा अपमान, सोशल मीडियावर संतापाची लाट

बागेश्वर बाबांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंसह अनेकांनी त्याबद्दल निषेध केला आहे.

Gangappa Pujari

दिलीप कांबळे..

Dhirendra Shastri: गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र महाराज शास्त्री चांगलेच चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांचा दैवी दरबार चर्चेत आहे. याबाबत नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हानही दिले होते. तेव्हापासून धीरेंद्र शास्त्री प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

मात्र सध्या त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात असून खासदार सुप्रिया सुळेंसह अनेकांनी त्याबद्दल निषेध केला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराज शास्त्री आपल्या दरबारात अनेक चमत्कार करत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. सध्या त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये केलेल्या वक्तव्यावरुन ते वादात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी माफीची मागणी केली आहे.

काय म्हणाले बागेश्व बाबा..

संत तुकाराम महाराजांबद्दल बोलताना बागेश्वर बाबाने "त्यांची बायको त्यांना रोज मारायची, त्यामुळे ते देव देव करायला लागले," असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार टीका होत आहे.

देहू संस्थानकडून निषेध...

"तुकाराम महाराज यांनी अन्नप्राशन केल्याशिवाय त्यांच्या पत्नी जेवण करत नव्हत्या त्यामुळे चुकीचा इतिहास पसरवू नका, तुम्हाला जर खरी माहिती घ्यायची असेल तर देहू मध्ये या आणि तुकाराम महाराजांची माहिती घ्या," अशा शब्दात देहू (Dehu) संस्थानकडून बागेश्वर बाबांना सुणावले आहे.

यांचं वक्तव्यानंतर धीरेंद्र शास्त्रींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी तुकाराम महाराजांची माफी मागावी असा इशारा दिला आहे.

त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळेंनीही "अज्ञान झाकून ठेवावं असं म्हटलं जातं. मात्र, लाखो लोकांसमोर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महान संतांबाबत चूकीचा इतिहास सांगून रोष वाढवून घेतला आहे," असे म्हणत बागेश्वर बाबावर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT