Sanjay Shirsat google
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवले

Sanjay Shirsat Cidco Chairman: शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागास शिरसाट यांना अध्यक्षपदावरून त्वरित हटवण्याचे आदेश दिले.

Dhanshri Shintre

शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. मंत्रीपद असूनही अध्यक्षपदी टिकून राहिल्याने त्यांच्यावर टीका होत होती. महायुती सरकारच्या काळात मंत्रीपदाने हुलकावणी दिल्यानंतर, संजय शिरसाट यांची नाराजी दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

सध्या शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खाते सोपविण्यात आले आहे. मात्र, नियमांनुसार मंत्रीपद स्वीकारल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित असते. तरीही शिरसाट गेल्या महिनाभराहून अधिक काळ दोन्ही पदांवर कार्यरत आहेत. या निर्णयामुळे नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनिक संकेतानुसार प्रश्न निर्माण झाले असून, सिडको अध्यक्षपदावरून शिरसाट यांना हटवण्याची चर्चा जोर धरत आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदी कायम ठेवले जाण्याच्या बातमीची गंभीर दखल घेऊन नगरविकास विभागाने कार्यवाही केली आहे. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर शिरसाट यांच्याकडे सिडकोचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते, परंतु नियमांच्या उल्लंघनामुळे नगरविकास विभागाने एका आदेशाद्वारे त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यभार समाप्त केला. यामुळे शिरसाट यांना सिडको अध्यक्षपदावरून हटवले गेल्याची घोषणा जाहीर करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये "एक व्यक्ती, एक पद" या सूत्राचा अवलंब करण्याची घोषणा केली होती, परंतु शिवसेनेचे संजय शिरसाट गेल्या महिनाभर सिडकोच्या अध्यक्षपदावर ठाण मांडून कार्यरत होते. शिरसाट यांनी संचालक मंडळाच्या बैठका घेत निर्णयांचा धडाका लावला. दोन पदे एकाच व्यक्तीला ठेवणे आणि लाभाचे पद उपभोगणे यावर पक्षातून नाराजी व्यक्त केल्यानंतर, उपमुख्यमंत्री शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी झाल्या. यानंतर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागास शिरसाट यांना अध्यक्षपदावरून त्वरित हटवण्याचे आदेश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

SCROLL FOR NEXT