Sanjay Shirsat-Sushma Andhare Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat News : संजय शिरसाट यांना मोठा दिलासा, सुषमा अंधारे विनयभंग प्रकरणी शिरसाटांना पोलिसांकडून क्लीनचीट

Sanjay Shirsat Vs Sushma Andhare : संभाजीनगर पोलिसांकडून संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News: शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांकडे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र संजय शिरसाट यांना पोलिसांनी मोठा दिलासा आहे.

पोलिसांकडून संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली आहे. संजय शिरसाट ज्यावेळी वक्तव्य केलं, त्यावेळी सुषमा अंधारे तेथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे संबंधित व्यक्ती समोर उपस्थिती नसल्यामुळे हा विनयभंग होत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी परळी येथे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिरसाट यांनी हे वक्तव्य संभाजीनगर येथे केलं असल्याने प्रकरण संभाजीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं होतं. (Political News)

सुषमा अंधारे यांनी विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा केला होता. पोलिसांनी यापैकी विनयभंग प्रकरणात संजय शिरसाट यांना क्लीनचिट दिली आहे. या संबधीचे पत्र सुषमा अंधारे यांना चार दिवसांपूर्वी पाठवण्यात आले आहे.

संजय शिरसाट म्हणाले...

मी वारंवार सांगितलं होतं, मी काहीही चुकीच वक्तव्य केलं नव्हतं. एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. आता तरी त्यांना समजलं असावं, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT