Sanjay Raut Tweet saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut Tweet: BBC वर IT चे छापे, संजय राऊत भडकले; 'रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत...'

Income Tax Raid on BBC Office: आयटीच्या बीबीसीच्या कार्यालयावर छापेमारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

Chandrakant Jagtap

Sanjay Raut Tweet On BBC: बीबीसी कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीसीच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. आयटीच्या या कारवाईनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच भारतीय लोकशाही डागाळत असल्याचे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर देखील टीका केली आहे.

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, "बीबीसीवरील छापेमारीची वेळ बघितली तर जास्त काही सांगायची गरज नाही. भारत आपली लोकशाही प्रतिमा वेगानं गमावतोय हेच यातून प्रतीत होतंय. भारताची लोकशाही धोक्यात आहे. न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता हे दोन शेवटचे गड शाबूत आहेत. आम्ही भारताच्या लोकशाहीसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू. जय हिंद!!"

बीबीसीवरील आयकर विभागाच्या धाडीबाबत काँग्रेसने देखील तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवरुन म्हटले की, "आधी बीबीसी डॉक्युमेन्ट्री आली, त्यावर बंदी घालण्यात आली. आता आयकर विभागाने बीबीसीवर छापा टाकला आहे. ही अघोषित आणीबाणी". (Latest Marathi News)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीबीसीच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. लंडनमधील बीबीसीच्या कार्यालयात छापेमारीची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप प्राप्तिकर विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT