Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'पंतप्रधान रिकामे येतात आणि झोळी भरून घेऊन जातात...', संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा, अर्थसंकल्पावरही केली टीका

Sanjay Raut targeted PM Modi: मुंबईच्या वाटेला साधा एक चमचाभर तरी हलवा आला का? अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

Ruchika Jadhav

Sanjay Raut's Reaction On Budget: काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साल २०२३- २०२४ चा अर्थसंकल्प जाहीर केला. संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलं होतं. अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर विरोधी पक्षातील काही नेते मंडळींनी यावर टीकास्त्र सोडलं आहे. अशात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर टीका केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, कालच्या अर्थसंकल्प आधिवेशनात मुंबईच्या वाटेला साधा एक चमचाभर तरी हलवा आला का? अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. ( Latest Sanjay Raut News)

अर्थसंकल्पाने आलेला अमृत काळ हा फक्त भाजपचा असणार आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका कशा असणार याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालचा अर्थसंकल्प आहे, असं राऊत म्हणालेत. मुंबईबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातून भारताला महसूल मिळतो. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कालच्या अर्थसंकल्पासह पंतप्रधान मोदींवर देखील टीका केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, " कालच्या अर्थसंकल्पात आधी दक्षिण ब्लॉगमध्ये बंद खोलीत हलवा केला. यातील चमचाभर हलवा देखील मुंबईच्या वाटेला आलेला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

भाजपनेत्यांच्या टोळधाडी सुरू आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन असे अर्थसंकल्प सादर केले जात आहे. उपमुख्यंत्री सातत्याने वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. मात्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात कारस्थान करण्याचे कमा होत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, मोदींनी एकाच महिन्यात दोन वेळा मुंबई दौरे केलेत. शिवसेनेची सत्ता घालवून महापालिका निवडणुक जिंकत त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे. तसेच मुंबईचे तुकडे करायचे आहेत. पंतप्रधान रिकामे येतात आणि झोळीभरून घेऊन जातात. देशाची अर्थव्यवस्था उद्धस्थ करण्याचं काम भाजपने केलं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Government Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवळीचं गिफ्ट, महिन्याच्या पगाराइतका मिळणार बोनस, वाचा पात्रता अन् अटी?

First Mobile Phone: 1 किलो वजनाचा मोबाईल अन् 10 तास चार्जिंग; वाचा रंजक इतिहास

Maharashtra Farmer : स्कायमेट वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवले, अकोल्यात २ हजार शेतकऱ्यांचं नुकसान

Navi Mumbai Airport : मोठी बातमी! ८ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता | VIDEO

Malanggad Fort History: निसर्ग, पर्यटन आणि ऐतिहासिक मलंगगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT