Sanjay Raut News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली हे दुर्दैव; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut On Prakash Ambedkar : युती करताना चर्चा झाली तर आपण दूर होताना सुद्धा एकत्रित चर्चा झाली पाहिजे. आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मयूर राणे

Political News :

प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं. युती करताना चर्चा झाली तर आपण दूर होताना सुद्धा एकत्रित चर्चा झाली पाहिजे. आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.

काल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासह असलेली युतीबाबत मोठी घोषणा केली. "उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती. नाही तर युती नाही, अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांवर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी आपलं मत व्यक्त केलंय.

युतीमध्ये लोकसभेचा विचार झाला नव्हता

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर शिवसेनेची युती झाली याला दीड वर्ष झालं आणि ते अतिशय चांगल्या हेतूने झालेली युती होती, त्यात प्रामुख्याने लोकसभेचा विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका यासंदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे त्याविरुद्ध एकत्र लढता येईल ही त्या दोन नेत्यांमधली भूमिका होती, असं संजय राऊतांनी सांगितलं.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत पुढे म्हणाले की, ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे. ते एकत्र आले याचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला झाला. त्यावेळेला युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती पण विधानसभा महानगरपालिका या स्तरावर काम करू असं ठरलं.

प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक

प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत, लोकसभे संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे. आम्हाला आजही वाटतं राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉ. आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं संविधानाचं मजबूत लोकशाहीचं ते संविधान आणि लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण गरजेचे आहे, असा सल्ला देखील संजय राऊतांनी यावेळी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg Death Case: गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी चुलत भावाला पोलिसांनी केली अटक; मनं सुन्न करणारे खुलासे आले समोर

BJP Leader Killed : भाजपच्या आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; पोलिसांनी सांगितलं धक्कादायक कारण

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमातळामुळे देशाचा जीडीपी वाढणार- देवेंद्र फडणवीस

Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Crime News: लग्न झालेल्या गर्लफ्रेंडची बलात्कारानंतर केली निर्घृण हत्या, मृतदेहासोबत दोन दिवस झोपला

SCROLL FOR NEXT