Raj and Uddhav Thackeray Saam Tv News
महाराष्ट्र

Politics: 'ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, मला ठाऊक' देशपांडेंच्या विधानावर खासदाराचं प्रत्युत्तर

Raut Responds to MNS Criticism: उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर संजय राऊतांचा प्रत्युत्तरात्मक बाण. “ठाकरे बंधूंशिवाय निर्णय नाही, काहींना संयम आणि राजकीय प्रशिक्षणाची गरज आहे,” असा टोला.

Bhagyashree Kamble

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक्षात अद्याप टाळी वाजलीच नाही. यावरून मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधत “अचानक एवढा उत्साह का? शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं होतं का?” असा सवाल केला होता. याच प्रश्नाला खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

देशपांडेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना आणि ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. दोन्ही नेते अंतिम निर्णय घेतील. आज जे कुणी बोलत आहेत, ते राजकारणात उशीरा आले आहेत. ठाकरे कुटुंबाशी माझे दीर्घकाळचे संबंध असल्यामुळे काय होणार आणि काय होणार नाही याची मला माहिती आहे, आणि ती इतकी कुणाकडेही नाही', असं संजय राऊत म्हणाले.

देशपांडे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका करत राऊत म्हणाले, 'त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ नाही आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या म्हणण्याला अर्थ आहे. कोण काय म्हणेल याला अर्थ नाही, असं संजय राऊत म्हणाले. आमच्याकडील कुणी त्यांच्या विरूद्ध बोलणार नाही आणि त्यांच्याकडील कुणीही आमच्याबद्दल बोलणार नाही', असं संजय राऊत म्हणाले.

'एकेकाळी महाविकास आघाडीसुद्धा अशक्य वाटत होती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री झाले आणि तीन वर्ष सरकार व्यवस्थित चाललं. राजकारणात माणसाने आशावादी असले पाहिजे. काही लोकांना संयम आणि राजकीय प्रशिक्षणाची गरज आहे', असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

राजकीय संयमावर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'नुसतं उखळ पणा करून राजकारणात कुठेही चालत नाही. विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न, मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न येतो, तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचा नेतृत्व आपण करू शकत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

'मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे..' राज ठाकरेंच्या ओपन चॅलेंजवर निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया | MNS v/s BJP

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

SCROLL FOR NEXT