Sanjay Raut Claim On Devendra Fadanvis Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'तुरुंगातील गुंड भाजपचे प्रवक्ते, राजकारणासाठी टोळ्यांचा आधार', सचिन वाझेच्या आरोपांनंतर संजय राऊत कडाडले!

Sanjay Raut Press Conference Pune: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील यांचेही नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. यावरुनच बोलताना खासदार संजय राऊत यांनीही भारतीय जनता पक्षासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, ता. ३ ऑगस्ट २०२४

१०० कोटी खंडणी प्रकरणात आरोपी असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने नव्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सचिन वझे याने १०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील यांचेही नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. यावरुनच बोलताना खासदार संजय राऊत यांनीही भारतीय जनता पक्षासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही माहिती पुढे आणली, आरोप केले. त्याला फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवे होते. पण त्यांना त्यासाठी तुरुंगातील प्रवक्ता लागतोय. पराभव टाळण्यासाठी भाजप अशा महाभागांना पुढे करत आहे, असे म्हणत सचिन वाझे कोण आहेत? आरोपी आहेत. कोठे आहेत ते सध्या? साबरमतीत आहेत की वर्ध्याला पवनार आश्रमात तपस्या करतायेत?" असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

तसेच "आम्ही वारंवार सांगतोय. निवडणूका जिंकण्यासाठी सरकारमधील लोक गुंड टोळ्यांचा तुरुंगातील लोकांचा वापर करत आहेत. तुरुंगातील लोकांकडे भाजप प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे का? आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. राज्यातील राजकारणाचे डर्टी पॉलीटिक्स देवेंद्र फडणवीस यांनी केले. निवडणुकांसाठी भाजप हे सर्व करत आहे," असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

"अटक होण्याआधी मला ही ॲाफर आली होती. ही बाब मी राज्यसभेचे सभापती व्यक्कय्या नायडु यांना पत्र लिहुन कळवली होती. माझ्यावर दबाव येत आहे हे माी त्यांना सांगितले होते, असे म्हणत भाजप पराभवाच्या छायेत असल्याने असे उद्योग सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतः निवडणूक हारणार आहेत," असा दावाही राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT