Sanjay Raut Criticized Maharashtra Government Saam Digital
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'कितीही फिरले, थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार..', संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

संजय महाजन

Sanjay Raut On PM Modi: संपूर्ण महाराष्ट्रमध्ये महा विकास आघाडीचे चित्र असल्याने पंतप्रधान इकडे जास्त फिरत आहेत. ते कितीही फिरले,थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार आहे, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. जळगावमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

"शिवाजी महाराज यांचे स्मारक शोधण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे. संभाजी राजे शोधत असतील तर त्यांना आमचा पहिंबा आहे. गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित आहे, त्यांनी त्याचा विचार करावा, पोवाड्याची ते चेष्टा करत आहेत. गद्दारांवर पोवाडे कोणी करत नाहीत, विरांच्यावर पोवाडे लिहिले जातात. त्यांना रेडा कोणी म्हटल,आम्ही डुकरे मारत नाहीत.." अशी टीका संजय राऊत यांनी केली.

"संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे चित्र असल्याने पंतप्रधान इकडे जास्त फिरत आहेत. ते कितीही फिरले,थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार.प्रधानमंत्र्यांनी किती वेळा जावे, याचा शिष्टाचार आहे. अकोल्यात काँग्रेस पक्ष अमली पदार्थ पैशावर निवडणूक जिंकत असल्याचं खोटं बोलत आहेत. गुजरात मध्ये काय चित्र आहे? ललित पाटील ला कोण संरक्षण देते? यावर मोदी बोलत नाहीत," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतही महत्वाचे विधान केले. "जयंत पाटील हे संयमी नेते आहेत. जागा बाबत ते कोणतेही चुकीची भूमिका घेणार नाहीत. सामंजस्याने ही निवडणूक लढविली जाईल. शरद पवार यांच्या सोबतचे अनेक जण सोडून गेले तरी मतदार त्यांच्या सोबतच आहे. सेनेत ही अशीच परिस्थिती आहे, असं ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: कोण होणार बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

SCROLL FOR NEXT