Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'आज 40 रेडे गुवाहाटीला गेलेत...', शिंदे गटावर संजय राऊतांचा हल्लाबोल

'महाराष्ट्रातले देव संपले का?' असा प्रश्न उपस्थित करुन संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बुलडाणा येथे सभा होत आहे. यावेळी संजय राऊतांनी (Sanjay Raut) विरोधकांवर सडकून टीका केली.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, सगळ्यात जास्त खोके हे बुलढाण्यात आले आहेत. एक फूल दोन हाफ.. एक खासदार दोन आमदार... ते आज तिकडे गुवाहाटीमध्ये देवीला नवस बोलायला गेले... महाराष्ट्रातील देव संपले काय? जिजाऊ, रेणुकामाता मंदिर बुलढाण्यात असताना हे ४० रेडे गुवाहाटीले गेले आहेत, असा हल्लबोल राऊतांनी यावेळी केला.

महाराष्ट्र संताचा आहे, आमच्याकडे ज्ञानेश्वारांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले. आणि मुख्यमंत्री 40 येड्यांचा बळी द्यायला गुवाहाटीला गेले, हे राज्याचं दुर्वेव आहे असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले. एकही खोकेवाला परत निवडून जाता कामा नये, अशी शपथ आपण घेतली पाहिजे. ना खासदार ना आमदार.. कुणालाही निवडून न देण्याची शपथ घेतली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. पेटलेल्या मशाली गद्दारेची खोके बेचिराग केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

आज ४० रेडे गुवाहाटीला गेलेत त्यांचे लक्ष इकडे लागले आहे. कारण हे नवस करून आणलेले लोक नाहीत, ते चटणी-भाकरी घेऊन आलेले लोक आहेत. शिवसेना आधीपेक्षा जोमाने पुढे जातेय. ही घोडदौड आता थांबता नये. तुम्ही चाळीस फोडले असाल पण विदर्भातले ४० लाख आमच्यासोबत आहेत. वतनदार फोडले असतील, पण हा मावळा आमच्यासोबत आहे, असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT