Sanjay Raut News  Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : राज ठाकरेंनी आता मन मोकळं केलं; युतीच्या प्रस्तावावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut News : राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावावर संजय राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. राज ठाकरेंनी आता मन मोकळं केल्याचं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

Vishal Gangurde

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोघेही बंधू युतीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत यांनीही युतीच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंनी आता मन मोकळं केलं आहे. ही रक्ताची नाती आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावावर दिली आहे.

राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्तावर दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी हात पुढे केला, मात्र एक अट देखील ठेवली. राज ठाकरे यांच्या प्रस्तावर संजय राऊत म्हणाले, 'राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका हिताची आहे. आमची भूमिका देखील महाराष्ट्र हिताची आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मी ऐकलं आहे. आम्ही आता सकारात्मक भूमिकेतून पाहत आहोत. माझी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे'.

'आज सकाळी चर्चा झाली झाली. काल रात्री देखील चर्चा झाली. आम्ही हवेत बोलत नाही. महाराष्ट्र आणि मुंबईतील मराठी माणसांसाठी एकत्र यावं लागेल. आम्ही त्याची वाट पाहू', असे राऊत पुढे म्हणाले.

'राज ठाकरे यांच्या काही प्रतिसाद आला तर आम्ही तो नाकरण्याचा करंटेपणा करणार नाहीत. सर्व शिवसैनिक आणि सर्व ठाकरे एक आहोत. आम्ही वैयक्तिरित्या जवळ आहोत. राज माझे मित्र आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत. हे तुम्ही मान्य करा, असे संजय राऊत यांनी सांगितले.

तर महायुतीची ताकद जाणून घेण्यासाठी तुम्हाला वॉशिंग्टनला जावं लागेल. महायुतीने केलेला इव्हीएममध्ये कसा घोटाळा ठाऊक आहे. भेटीगाठी झालं तर काय झालं, असे राऊत यांनी सांगितले.

'आता त्यांचे पुढे काय होतं, याकडे आमचं लक्ष आहे. राज ठाकरे यांनी मन मोकळं केलं आहे. त्यांची रक्ताची नाती आहेत. दोघांचे पुढे काय होतं, याकडे आमचं लक्ष आहे, असे संजय राऊत यांनी पुढे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oral Medicines: सरकारचा नवा नियम; आता मेडिकलमधून कोणालाही मिळणार नाहीत ही औषधं, जाणून घ्या कारण

Sairat 2: 'सैराट २' येणार का? नागराज मंजुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, 'चांगली कथा असेल तरच...'

ITR Update : वेळेत आयटीआर भरला तरीही रिफंड अडकू शकतो; एका चुकीमुळे भरावा लागेल दंड

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला

म्हातारपणात मुलांनी सांभाळलं नाही, तर आई-वडील आपली मालमत्ता परत घेऊ शकतात: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT