MP Sanjay Raut Latest Marathi News saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: शिंदेंचा एक खासदार ड्रग्स घेतो; संजय राऊतांच्या आरोपानं राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Raut News: शिंदेंच्या गटातील एक खासदार देखील ड्रग्स घेतो असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Politics:

राज्यात सातत्याने अंमली पदार्थांप्रकरणी मोठ्या कारवाया सुरू आहेत. ललित पाटीलनंतर सापांच्या विषाची तस्करी प्रकरणात एल्विश यादवचं नाव समोर आलंय. या सर्वांवरून खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच शिंदेंच्या गटातील एक खासदार देखील ड्रग्स घेतो असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सापाच्या विषाची तस्करी करणारा, रेव्ह पार्टीत सापाच्या विषातून तयार होणाऱ्या अंमली पदार्थाची तस्करी कराणारा एल्विश वर्षा बंगल्यावर गेला होता. तिथे एखाद्या सुपर हिरो सारखं त्याचं स्वागत केलं गेलं. त्याला मिठ्या मारल्या गेल्या. त्यानंतर शिंदेंच्या गटातील एका खासदाराने त्याला आपल्या घरी नेलं. सदर खासदार स्वत: अंमली पदार्थांचे सेवन करत आहे. याबाबत माझ्याकडे पक्की माहिती असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय.

गणेशोस्तवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी एल्विश देखील वर्षावर गेला होता. त्यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केलाय.

महाराष्ट्रासह देशामध्ये अंमली पदार्थांचा जो व्यापार सुरू आहे त्याची सूत्रे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांपर्यंत या व्यक्तीला कोणी पोहचवलं. त्यांच्या टोळीतील ती व्यक्ती कोण आहे? याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांना द्यावं लागले, असंही संजय राऊत म्हणाले.

माझं अमित शहांना आवाहन आहे. कारण हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत पोहचलाय तर त्याचं काय कारण आहे, असं संजय राऊत म्हणाले. राज्यातील अंमली पदार्थांप्रकरणातील एल्विश यादव आणि ललित पाटील यांच्याकडून प्रोटेक्शन मनी दिलं जातंय, असा आरोपही राऊतांनी यावेळी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shocking : वंशाला दिवाच हवा म्हणून गर्भपात केला, पण महिलेचा जीव गेला, सोलापूरमधील धक्कादायक घटना

Gold Price Today : आजपण सोनं महागलं, ख्रिसमसला प्रति तोळा इतका दर वाढला, पाहा ताजे रेट्स

BOI Recruitment: खुशखबर! फ्रेशर्ससाठी बँकेत नोकरी; ४०० पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Baba Vanga: पुढचं वर्ष बदलणार आर्थिक गणितं? बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार ४ राशी ठरणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT