Sanjay Raut  saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'शाखा ताब्यात घ्यायला त्यांचे बाप...', संजय राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा घणाघात

Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या निर्णायाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरु आहे.

Chandrakant Jagtap

>>भूषण शिंदे

Sanjay Raut : शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गट अधिक सक्रिय झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णायाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरु आहे. यासंदर्भात आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माहिती दिली आहे.

आमची कायदेशीर प्रक्रियेसाठी बैठक सुरू असून काय मांडायचं आहे ते ठरवू अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेचे नाव आणि चिन्ह विकण्याचा हा सौदा झाला असून तो 2 हजार कोटींचा झाला आहे, असा आरोप यावेळी राऊत यांनी केला. यात पुरावे काय हवे आहेत, कामळाबाईला हे झोंबलं आहे, याचा खुलासा लवकरच होईल असेही राऊत म्हणाले.

दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवल्यानंतर आता शिंदे गट राज्यभरातील शिवसेनेचे कार्यालये आणि शाखांवर दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यावर देखील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, 'शाखा ताब्यात घ्यायला त्यांचे बाप आले पाहिजेत. दापोलीमध्ये काय झालं तुम्ही पाहिलं. हे लोक चिन्ह आणि पक्षाचे नाव विकत घेऊ शकतात, पण आमची हिम्मत नाही विकत घेऊ शकत'. (Latest Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांची मातोश्रीवर होणार बैठक होणार आहे. या बैठकीत समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि आजाद समाज पार्टीचे नेते सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेश सपाचे वरिष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्या, आजाद समाज पार्टीचे मुंबई अध्यक्ष कैलास जैसवार आणि आम आदमी पक्षाचे दिल्लीचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम हे देखील मातोश्रीवर दाखल होतील. (Maharashtra Politics)

तिन्ही पक्षांच्या नेत्या सोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. आगामी मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकांच्या भार्श्वभूमीवर आणि सध्या राज्याच्या राजकीय स्थितीवर संध्याकाळी 4 वाजता या बैठकीत चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तमाशाच्या कार्यक्रमात तरुणाला लाकडी काठ्याने बेदम मारहाण

Purandar Airport: विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटला; शेतकऱ्यांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबईत मोठा राडा; CSMT स्टेशनबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रस्ता अडवला

Mumbai Crime: गार्डनमध्ये एकटीला बघून नियत फिरली, दिव्यांग महिलेसोबत पोलिसाचं भयंकर कृत्य, नागरिकांनी बघितलं अन्...

Eyebrow Growth: भुवया वाढतील रातोरात, फॉलो करा हे ५ मिनिटाचं रुटीन, तुम्हीच दिसाल आकर्षक

SCROLL FOR NEXT