Uddhav Thackeray
Uddhav Thackeray saam tv

Uddhav Thackeray: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यांतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये; उचललं मोठं राजकीय पाऊल

ठाकरे गटाची कमी झालेली राजकीय ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोठं राजकीय पाऊल उचललं आहे.
Published on

>> रुपाली बडवे

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गमावले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची कमी झालेली राजकीय ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोठं राजकीय पाऊल उचललं आहे.

भाजप विरोधीपक्षांच्या नेत्यांची मातोश्रीवर थोड्याच वेळात बैठक होणार आहे. मातोश्रीवर समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि आजाद समाज पार्टी नेत्यांची काही वेळात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा होणार आहे. (Political News)

Uddhav Thackeray
Thackeray VS Shinde: शिवसेना पक्षाचा निर्णय आल्यानंतर ठाकरे गटाआधी शिंदे गट सुप्रीम कोर्टात, कॅव्हेट केला दाखल

उत्तर प्रदेश समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्या, आजाद समाज पार्टीचे मुंबई अध्यक्ष कैलास जैसवार आणि आम आदमी पक्षाचे दिल्लीचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम काही वेळात मातोश्रीवर पोहोचणार आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत.

Uddhav Thackeray
Sanjay Raut: 'धनुष्यबाणाच्या चोरांना…’ संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, म्हणाले; संशयित चोर...

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि येणाऱ्या इतर निवडणुका आणि सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर संध्याकाळी 4 वाजता बैठकीत चर्चा होणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com