रणजीत माजगावकर
Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळावर केलेल्या वक्तव्याने ते चांगलेच अडचणीत आलेत. राऊतांना विधानसभा सचिवांकडून बुधवारी संध्याकाळी नोटीस जारी करण्यात आली आहे. आज संध्याकाळी या नोटीसला ४८ तास पूर्ण होत आहेत. त्यामूळे संजय राऊतांना आजच विधानसभा सचिवांना लेखी उत्तर द्यावे लागणार आहे.सचिवांना उत्तर देण्याआधी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Maharashtra Politics News)
माध्यमांशी बोलताना संजय राऊतांना नोटीसच्या उत्तराविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, 'मी अजून नोटीस वाचली नाही,माझ्या हातात अजून नोटीस पडलेली नाही. माझ्या हातात नोटीस असती तर मी उत्तर देऊ शकलो असतो. इतक्या घाईघाईत कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही. मला कायद्याचा अभ्यास करावा लागेल.'
'या राज्यात सगळ्याच गोष्टी बेकायदेशीर सुरू असल्यामुळे सरकारच बेकायदेशीरपणे बसलेलं आहे. मी विधिमंडळाचा आणि आमदारांचा अपमान होईल असं काहीही म्हटलं नाही. एक विशिष्ट गट जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे असं सांगतो आहे त्या गटाबद्दल मी बोललेलो आहे. त्यामुळे हक्कभंग होतो की नाही हे पाहावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे यावर संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी म्हटलं की, 'आज उत्तर नाही दिलं तर मला फासावर लटकवणार आहात का? लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा. हक्कभंग समिती ही पक्षपाती आहे. मूळ शिवसेनेचा एकही सदस्य त्यात घेतलेला नाही. ज्यांनी तक्रार दिलेली आहे त्यांनाच न्यायाधीश करण्याचा प्रकार केलाय.'
आठवले गटाला जागा मिळाल्या हे तर आश्चर्यच
नागालँडमध्ये आठवले गटाला जागा मिळाल्या आहेत. हे जगातलं मोठं आश्चर्य आहे. महाराष्ट्रात जरी त्यांना जागा मिळाल्या नसल्या तरी नागालँडच्या भूमीवर त्यांना जागा मिळाल्या मी याबाबत त्यांच अभिनंदन करतो.
आज दुपारी 12.30 वाजता हक्कभंग समितीची बैठक आहे. हे प्रकरण आज हक्कभंग समितीकडे वर्ग केले जाणार आहे. राऊतांचे आज लेखी उत्तर न आल्यास हक्कभंग समिती पुढील कारवाईचा निर्णय घेणार. त्यामुळे आता संजय राऊत नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.