MLA Sanjay Gaikwad faces backlash after alleged threat call to publisher over Shivaji book controversy. saam tv
महाराष्ट्र

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

Political Row Erupts as MLA Gaikwad Targets: शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी काही केल्या थांबायला तयार नाही...यावेळी गायकवाडांनी थेट एका पुस्तकाच्या प्रकाशकालाच जीवे मारण्याची धमकी दिलीय... गायकवाड प्रकाशकावर इतके का चिडले? त्यांचा कोणत्या पुस्तकावर राग आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

गावगुंडाप्रमाणं आमदार निवासातील कॅन्टिन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे... राहुल गांधींची जीभ छाटण्याचं वादग्रस्त विधान करणारे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी काही थांबताना दिसत नाही...अशातच संजय गायकवाडांनी पुन्हा एकदा बॉक्सिंग स्टाईलनं थेट एका प्रकाशकालाच घरात घुसून मारण्याची धमकी दिलीय...यावेळेला निमित्त ठरलं ते गोविंद पानसरेंनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं.. गायकवाडांच्या या धमकीचं कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झालयं...

पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांनी थेट जीभ छाटण्याचं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रकाशकानं केलाय..

हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर राज्यातील पुरोगामी कार्यकर्त्यांनी गायकवाडांच्या वादग्रस्त विधानावर आक्रमक पवित्रा घेतला...दरम्यान पानसरे कुटुंबीयांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केलीय...

दुसरीकडे शिंदेसेनेचे आमदार संजय गाय़कवाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत... छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही...असं म्हणत गायकवाडांनी प्रकाशकाची जीभ हासडण्याची पुन्हा एकदा धमकी दिलीय..तर गायकवाडांनी जुन्या विषयात जाऊ नये, असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलाय....

- वैचारिक साहित्यावर बंदी घालण्याची मागणी करणं आणि त्यावर चर्चा करण्याऐवजी थेट प्रकाशकाला जीवे मारण्याच्या धमक्या देणं हीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे का? सत्तेच्या मस्तीत सातत्यानं धमक्या देणाऱ्या आणि लोकप्रतिनिधीच्या पदाच्या साध्या मर्यांदाही न सांभाळणाऱ्या गायकवाडांसारख्या आमदारांना पक्षातील वरिष्ठ नेते वेसण का घालत नाहीत का ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : संजूचा पॉवर पंच! वानखेडेवर ठोकलं शतक, मुंबईच्या गोलंदाजांची केली धुलाई

सप्तश्रृंगी गडावरील मंदिरात दरोडा, मंदिरातील 22 किलो चांदी गायब

भाजपच्या मोर्च्यात नडणारी महिला सापडली? जाब विचारणारी महिला बिग बॉस फेम पूजा मिश्रा?

विधानपरिषदेच्या ९ नव्हे, तर १० जागांसाठी होणार निवडणूक; मतमोजणी आणि निकाल कधी? जाणून घ्या

गोडसेनं गोळी झाडली नसती तर हिंदू कलमा पढत असते, जैन मुनींनी उधळली मुक्ताफळं

SCROLL FOR NEXT