Shinde Sena MLA Sanjay Gaikwad creates a stir with his remark on massive election expenses, triggering reactions from opposition and ruling allies. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: निवडणुकीसाठी 3 कोटी आणि 100 बोकडं निवडणूक खर्चावरुन आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान

Sanjay Gaikwad Statement: नेहमीच वादग्रस्त विधान करणारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांनी निवडणुकीच्या खर्चावर वक्तव्य केलंय. त्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. पाहूया गायकवाड नेमके काय बोललेत ?

Girish Nikam

निवडणूक लढवणे हे सामान्यांच्या आवाक्यात राहिलं नाही हे वास्तव आहे. अगदी ज्येष्ठ नेते शरद पवारांपासून ते सत्ताधारी वर्तुळातील अनेक नेत्यांनी ते मान्य केलंय. आता निवडणूक खर्चावरुन पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्याला निमित्त ठरलंय शिंदे सेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं विधान...आमदार निवासमध्ये कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीच्या घटनेवरुन गायकवाडांवर नुकतीच चौफेर टीका झाली होती. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर गायकवाडांनी खर्चाचं गुपीतच उघडं केलंय. त्यावरुन विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलंय.

गायकवाडांच्या या वक्तव्यावरुन भाजपनेही हात झटकलेत. मंत्री गिरीश महाजन यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं ते ऐका दुसरीकडे ठाकरे सेनेनेही गायकवाडांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय.

कधी हाणामारी तर कधी वादग्रस्त वक्तव्य करुन टीका ओढवून घेणारे गायकवाड यांना पक्ष नेतृत्व आता तरी तंबी देणार का? हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे निवडणुकीतील वारेमाप खर्चावरुन निवडणूक आयोगही कडक धोरण आखणार का? आगामी पालिका निवडणुकीत खरंच खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे होणार का? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : नाद करा, पण आमचा कुठं! भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अभिषेक- गिलने धू धू धुतलं

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

SCROLL FOR NEXT