Sanjay Biyani
Sanjay Biyani saam tv
महाराष्ट्र

Nanded: परभणीत रचला गेला संजय बियाणींच्या खूनाचा कट? पत्रानं उडाली खळबळ

संतोष जोशी

नांदेड : नांदेडचे (nanded) बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (sanjay biyani) यांच्या खूनाचा कट परभणीत (parbhani) रचल्याचे पत्र नुकतेच त्यांच्या कुटुंबियांनी पाठविल्याची घटना उघडकीस आली आहे. या पत्राची माहिती कुटुंबियांनी पाेलिसांना (police) कळवली आहे. (sanjay biyani latest marathi news)

नांदेड येथे आठ दिवसांपुर्वी संजय बियाणी (sanjay biyani case latest updates) यांचा भरदिवसा गोळ्या झाडून खून झाला. त्यानंतर पाेलिसांनी मारेकरी पकडण्यासाठी विशेष तपास यंत्रणा स्थापित केली आहे. परंतु आज पर्यंत पोलिसांना त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत.

दरम्यान राज्यभर गाजत असलेल्या या खून प्रकरणात सध्या एका निनावी पत्राने खळबळ उडवून दिली आहे. बियाणी यांच्या कुटुंबियांना आलेल्या पत्रात त्यांचा खूनाचा कट परभणीत शिजला असल्याचे लिहिले आहे. आनंदनगरच्या एका मोठा दादाचा यामध्ये हात असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे खून प्रकरणाचे धागेदोरे परभणीत तर नाहीत ना अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत पोलिसांनी तरी सध्या ताेंडावर बाेट ठेवत काहीच बोलण्यास नकरा दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Share Market जगात पुन्हा हर्षद मेहता घोटाळ्याची पुनरावृत्ती होणार?

Relationship Tips: लग्न ठरवण्यापुर्वी जोडीदाराला अवरजून विचारा 'हे' प्रश्न

SRH vs LSG,Weather Update: हैदराबाद- लखनऊ सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

Today's Marathi News Live : नंदुरबारमधील प्रियंका गांधी यांची सभा रद्द

Crime News: मॅट्रिमोनिअल साइट्सवर ओळख; ७ महिलांशी लग्न आणि तिघींवर अत्याचार, शिक्षिकेमुळे पितळ उघडं पडलं

SCROLL FOR NEXT