Sangli ZP Saam tv
महाराष्ट्र

Sangli ZP : महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांच्या संगोपनासाठी पाळणाघर; सांगली जिल्हा परिषदेचा उपक्रम

Sangli News : सांगली जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने पाळणाघर सुरू करण्यात आले. या पाळणाघराचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

विजय पाटील

सांगली : ड्युटीवर आल्यानंतर बऱ्याचदा लहान बाळांचा सांभाळ करण्यासाठी घरी कोणी नसते. यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना लहान बाळांना घेऊन कामावर यावे लागते. अशा महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांचे संगोपन करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पाळणाघर सुरू करण्यात आले आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये हि सुविधा सुरु करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेला एसी शववाहिका देखील मिळाल्या आहेत. 

शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांना सहा महिन्यांची बाळंतपणाची सुटी आहे. मात्र त्यानंतर बाळाला घरी सोडून ड्युटीवर हजर व्हावे लागत असते. अशा कर्मचाऱ्यांसाठी सांगली जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने पाळणाघर सुरू करण्यात आले आहे. या पाळणाघराचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पाळणाघरात लहान मुलांसाठी सर्व सुविधा 

पाळणाघरामध्ये लहान मुलांना खेळण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी या आपल्या मुलांना कामावर आल्यानंतर पाळणा घरात सोडू शकणार आहेत. तसेच कामावरून परत जाताना मुलांना आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे हे पाळणाघर अत्यंत सोयीचे आणि मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी ठरणार आहे. 

तीन एसी शववाहिका प्राप्त
पाळणाघर सुरू करण्यासोबत जिल्हा परिषदेला तीन एसी शववाहिका प्राप्त झाल्या आहेत. या शववाहिकेमध्ये शव ठेवण्यासाठी बंदिस्त काचेची पेटी असून बाजूला नातेवाईकांना बसण्याची सोय आहे. एखाद्या वेळेस तालुक्याच्या ठिकाणावरून गावापर्यंत मृतदेह न्यायचा असेल तर ही एससी शववाहिका फार उपयोगी ठरणार आहे. शववाहिका एससी असल्याने मृतदेह जास्त काळ राहिला तरी मृतदेह सडू नये, यासाठी विशेष व्यवस्था या गाडीमध्ये करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personal Loan EMI: पर्सनल लोन घेतलंय? व्याजाचा बोजा कमी करण्यासाठी हे 5 उपाय नक्की करा

Palghar Fort : निसर्गाच्या सान्निध्यात; १,०७० फूट उंच पालघरमधील 'हा' किल्ला तुमचं पुढचं ट्रेकिंग डेस्टिनेशन

Maharashtra News Live Update :पुण्यात कोंढवा कौसरबागेतील रस्ता अतिक्रमणमुक्त

Nushrratt Bharuccha: प्रसिद्ध अभिनेत्रीचा परदेशात धक्कादायक अपघात; ऑक्सिजन सपोर्टवर, एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत दाखल

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील अनेक ट्रेन रद्द; काहींचे मार्ग बदलले, वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT