Sangli Teacher Manohar Kamble Dies Of Heart Attack During Independence Day Program AI Image
महाराष्ट्र

Shocking : स्वातंत्र्यदिनी दुःखद घटना! ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान शिक्षकाचा मृत्यू; सांगलीत नेमकं काय घडलं?

Sangali Teacher Dies Heart Attack : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

Alisha Khedekar

  • सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कोकरूडमध्ये धक्कादायक घटना घडली

  • स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान शिक्षकाला हृदयविकाराचा झटका

  • शिक्षकाचा जागीच मृत्यू

  • शाळा आणि विद्यार्थ्यांवर शोककळा

विजय पाटील, सांगली

देशभरात काल ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सरकारी कार्यलय, शाळा कॉलेजसह अनेक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. एकीकडे स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना दुसरीकडे मात्र सांगलीतील शिराळा तालुक्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मन हेलावून टाकणारी घटना घडली. कोकरूड येथे एका शिक्षकाचा अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मनोहर शामराव कांबळे (वय ४५) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मनोहर कांबळे हे कोकरूड येथील मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यानंतर गावातील बाजारपेठेत आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थी व्यासपीठावर स्वातंत्र्यगीत सादर करत होते. यावेळी कांबळे हे स्टेजसमोर उभ्या असलेल्या लहान मुलांना शिस्तीत उभे करत होते.

मुलांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या घरात नेले. त्यांना साखरपाणी देण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्यांना थोडे बरे वाटले. मात्र, काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

स्वातंत्र्य दिनाचा आनंदाचा सोहळा सुरू असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने उपस्थितांना मोठा धक्का बसला. विद्यार्थ्यांसोबत कायम आपुलकीने वावरणारे शिक्षक मनोहर कांबळे यांच्या अचानक जाण्याने शैक्षणिक वर्तुळासह कोकरूड परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल शिराळा तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT