Sangli Crime Saam Tv
महाराष्ट्र

Sangli: नवऱ्याकडून शारीरिक संबंधाची मागणी, दुसऱ्या बायकोनं नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली; लग्नाच्या १५ दिवसानंतरच..

Wife Kills Husband: लग्नाच्या केवळ १५ दिवसांतच पत्नीने नवऱ्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पतीकडून वारंवार शारीरिक संबंधांचा आग्रह केल्यामुळे पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Bhagyashree Kamble

इंदूरमधील राजा रघुवंशीचं प्रकरण ताजे असतानाच सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दुसऱ्या बायकोने लग्नाच्या १५ दिवसानंतर नवऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून संपवलं आहे. पतीकडून वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केली जात होती. मात्र, ती कायम विरोध करत होती. यामुळे संतप्त झालेल्या बायकोने नवऱ्याची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका असं २७ वर्षीय आरोपी तरूणीचे नाव आहे. तर, अनिल असे ५६ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी रात्री दोघांमध्ये भांडण सुरू होतं. भांडणाचा राग राधिकाच्या पोटात खदखदत होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पहाटे १२:३० च्या सुमारास अनिल झोपलेला असताना राधिकाने अनिलच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात अनिलचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर राधिकाने सगळी हकिकत आपल्या चुलत भावाला सांगितली. पोलिसांनी घटनेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, 'अवघ्या १५ दिवसांपूर्वी राधिकाचं अनिलसोबत लग्न झालं होतं. अनिलच्या पहिल्या बायकोचं कर्करोगाने निधन झाले होते. लग्नानंतर तो राधिकाकडे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरत होता. यामुळे राधिका संतापली होती. संतप्त राधिकाने भांडणानंतर नवऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले'.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. तसेच तपास करीत राधिकाला बेड्या ठोकल्या. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, राधिकाला कुपवाड येथील घरातून बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी राधिकाविरूद्ध बीएनएसच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT