Krishna and Warana River Water Storage Saamtv
महाराष्ट्र

Sangli Rain News: 'अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढवा, अन्यथा सांगलीला महापुराचा धोका', महापूर नियंत्रण कृती समितीची सरकारकडे मागणी

Sangli Rain News: राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातुन पाणी साठा कमी करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणला नाही, तर यंदा देखील सांगलीला महापुराचा फटका बसेल.

विजय पाटील

सांगली, ता. २५ जुलै २०२४

सांगली प्रशासनाने राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही, शिवाय कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येतोय, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातुन पाणी साठा कमी करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणला नाही, तर यंदा देखील सांगलीला महापुराचा फटका बसेल, अशी भीती कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे,

26 जुलैपर्यंत याबाबत सरकारने योग्य ती पावले न उचलल्यास एक ऑगस्ट रोजी कृष्णा नदीच्या पात्रात जलपुडी आंदोलन करू असा इशारा कृष्णा महापौर नियंत्रण नागरिक कृती समितीकडून देण्यात आला आहे.

सांगलीच्या चांदोली परीसरात गेल्या पाच सहा दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाच्या एकूण चार दरवाज्यातून 8886 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे वारणा नदी पात्राबाहेर गेली असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. आरळा शितुर पूल पाण्याखाली गेला असून शिराळा व शाहूवाडी तालुक्याचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे त्यामुळे धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT