Maharashtra Politics News: Saamtv
महाराष्ट्र

Sangli Politics: 'भंपक माणसांचे राजकारण..', मारहाण प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर संजयकाका पाटील संतापले; रोहित पाटलांवर टीकास्त्र

Maharashtra Politics News: माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर संजयकाका पाटलांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

विजय पाटील

सांगली, ता. २८ सप्टेंबर

Sanjay Kaka Patil On Rohit Patil: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याचा आरोप सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला. दरम्यान, यावरुनच आता संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटलांवर जोरदार टीका केली आहे. कवठे महांकाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष यांना संजयकाका पाटलांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्या समोर आंदोलन केलं होते. त्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, यावर संजयकाका पाटलांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

यावरुनच आता संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कवठेमंकाळ मधल्या राड्याप्रकरणी रोहित पाटलांकडून घाणेरड्या पद्धतीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप करत, राजकीय हेतूने रोहित पाटलांनी पोलिसांच्यावर दबाव आणून आपल्यावर गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप संजयकाका पाटलांनी केला आहे. तसेच या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.

दरम्यान, कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. संजय काका पाटील यांनी कवठेमंकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्या घरात घुसून त्यांच्या आईला देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी संजयकाका पाटील विरोधात कारवाईसाठी आमदार सुमनताई व रोहित पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्या समोर ठिय्या आंदोलन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT