sangli, arrest, police saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर पाेलिसांच्या धडक माेहिमेस प्रारंभ, सांगलीत दाेन युवकांना अटक

पाेलिसांच्या कारवाईमुळे युवा वर्ग व्यसनापासून दूर हाेईल अशी आशा नागरिकांना आहे.

विजय पाटील

Sangli News : सांगलीत नशेच्या गोळ्यांची बिनधास्त विक्री केली जात असल्याचे वृत्त साम टीव्हीने दाखविल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. सांगली जिल्ह्यातल्या नशेखोरी विरोधात सांगली पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली. या अंतर्गत सांगली शहरामध्ये (sangli police) छापा टाकून नशेच्या गोळयांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. (Maharashtra News)

मानसिक आजारावरील गोळ्यांचा उपयोग नशेसाठी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर साम टीव्हीने काही दिवसांपुर्वी जनतेसमाेर आणला. यामुळे युवा पिढी (youth) व्यसनाधीन हाेण्याचा संभव धाेका साम टीव्हीने तज्ञांच्या प्रतिक्रियांसह दाखविले.

साम टीव्हीच्या वृत्ताची दखल घेत पोलीस प्रशासनाने सांगली जिल्ह्यातल्या नशेखोरी विरोधात धडक मोहीम सुरू केली. या अंतर्गत सांगली शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने गोळयांची विकणाऱ्या दोघांना अटक केली.

त्यांच्याकडून सुमारे अडीचशे गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अनिकेत कुकडे (वय 21) आणि उमर महात (वय 20) असं अटक केलेल्या दोघा संशयतांची नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अडकलेला PF Transfer होणार झटपट; फक्त 5 मिनिटांचं काम

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

SCROLL FOR NEXT