Miraj News Saam tv
महाराष्ट्र

Miraj News : वाढदिवसाच्या बॅनरखाली कापडात बांधलेली गाठोडी; जादूटोणा करण्याची शंका, सलग तीन दिवसांपासून सुरु आहे प्रकार

Sangli news : सांगलीच्या मिरजमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवसाचे बॅनर लावले आहेत

विजय पाटील

सांगली : राजकीय नेते, पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस असला कि त्यांचे कार्यकर्ते वाढदिवसानिमित्ताने ठिकठिकाणी शुभेच्छापर बॅनर लावत असतात. अशाच प्रकारे मिरजेत लावण्यात आलेल्या वाढदिवसाच्या बॅनर खाली कापडात बांधलेली छोटी गाठोडी आढळून आली आहे. सलग तीन दिवस वेगवेगळी गाठोडी ठेवण्याचा प्रकार केला जात असून जादूटोण्याचा हा प्रकार केल्याची शंका वर्तविली जात आहे.  

सांगलीच्या मिरजमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवसाचे बॅनर लावले आहेत. मात्र या डिजिटल बॅनरवर जादूटोणा करण्याचा प्रकार समोर आला आहे. वखार भाग माळी समाज स्मशानभूमी जवळ लावण्यात आलेल्या डिजिटल बॅनर खाली तीन दिवस झाले कोणी तरी आज्ञात व्यक्ती ही छोटी गाठोडी टाकून गेला आहे.  

तीन दिवस वेगवेगळ्या रंगाचे कापड 

छोट्या गाठोड्यात जादूटोणा केलेले साहित्य असल्याने नागरिकांनी भीती पोटी अजून उघडून पाहिली नाहीत. या ठिकाणी विश्रांतीसाठी बसणाऱ्या स्थानिक नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आल्याने आज त्यांनी ही माहिती डॉ. पंकज म्हेत्रे यांना दिली. तीन वेगवेगळ्या कापडाची हि गाठोडी होती. यात पहिल्या दिवशी हिरवा रंगाचे, दुसऱ्या दिवशी लाल आणि तिसऱ्या दिवशी लाल रंगाचे हे गाठोडे टाकण्यात आले आहे.  

अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचा अंनिसचा दावा 

दरम्यान याबाबत अनिस संघटनेच्या पदाधिकारी ज्योती आदाटे याच्याशी संपर्क साधला असता हा सर्व प्रकार अंधश्रद्धेचा असून भारत- पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिसाईल टाकण्यापेक्षा असली गाठोडी करून टाकली असती; असे मत व्यक्त केले आहे. अशा अंधश्रद्धा वर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी आवाहन केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल

Subodh Bhave: सुबोध भावे झळकणार नव्या बायोपिकमध्ये; निम करोली बाबांची साकारणार भूमिका, पोस्टर प्रदर्शित

Satara : वरवी पिठाची भाकरी खाल्ल्याने ७० जणांना विषबाधा; पीठ विक्रेत्यांचे दुकाने सील

२ गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला; NCP आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

Fact Check : कोल्डड्रिंकमध्ये व्हायरस? काय आहे व्हॉट्सअ‍ॅपवर होणाऱ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT