Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : बैलगाडाचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू; सांगलीत वाळुज येथील उरूसातील घटना

Sangli News : एक बैलगाडा पळत असताना बैलगाडा थेट बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला. या धावपळीत रोहन घोरपडे पळत असताना तो पाय घसरून पडला

विजय पाटील

सांगली : परंपरेनुसार पिरांच्या उरूस दरम्यान बैलगाडा पळविण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बैल बिथरले. ते थेट गर्दीत गेल्यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली. यात एक तरुण खाली पडला असता अंगावरून चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सदरची घटना (Sangli) सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये आज दुपारच्या सुमारास घडली. (Breaking Marathi News)

सांगलीच्या खानापूर (Khanapur) तालुक्यातील वाळूजमध्ये उरूसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमादरम्यान बैलगाडाच्या चाकाखाली आल्याने रोहन राजेंद्र घोरपडे (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला. वाळूज गावात पिराचा उरूस सुरु असून खडी येथे बैलगाडा पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. या परंपरेंनुसार बैलगाडा (Bullock Cart) पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र यातील एक बैलगाडा पळत असताना बैलगाडा थेट बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला. या धावपळीत रोहन घोरपडे पळत असताना तो पाय घसरून पडला आणि त्याच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू 

उरूसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते. हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला. यानंतर रोहनला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच रोहन याचा रस्त्यात मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! जुनी पेन्शन संदर्भात मोठा निर्णय, कुणाला होणार लागू? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

SCROLL FOR NEXT