Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीकडून हॉस्पिटलची तोडफोड; आरोग्य योजनांच्या नावाखाली पैसे घेत असल्याचा आरोप

Sangli News : रुग्णालयात शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात. मात्र शासकीय योजनेतून उपचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी केला आहे

विजय पाटील

सांगली : ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना आणि बांधकाम कामगारांच्या आरोग्य योजनेच्या नावाखाली पैसे घेतले जात आहेत. तसेच योजनेत दाखल रुग्णांना वेगळी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत सांगलीमध्ये एका खाजगी रुग्णालयात वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत वंचितच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

सांगली शहरातल्या विश्रामबाग चौक येथील असणाऱ्या आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घुसून वंचितच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. दरम्यान रुग्णालयात शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात. मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून उपचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी केला आहे. तसेच रुग्णालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील असणाऱ्या काचा आणि साहित्यांची नासधूस केली आहे. 

पोलिसांनी घेतले ताब्यात 

दरम्यान हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीबाबत रुग्णालयातील डॉक्टरांकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी लागलीच रुग्णालयात येत तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबविले. तसेच काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. मात्र कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयात होत असलेले प्रकार थांबविण्याची मागणी केली आहे. 

रुग्णालय प्रशासनाकडून आरोपांचे खंडन 

दरम्यान घडल्या प्रकाराबाबत करण्यात आलेल्या आरोपांचे रुग्णालय प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे. योजनेतून आरोग्य सेवा पुरवीत असून लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे जादाचे पैसे घेतले जात नसल्याचे आदित्य हॉस्पिटलचे डॉ. शरद सावंत यांनी सांगितले. तर जाणून बुजून प्लॅन करून तोडफोड करण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

Maharashtra News Live Update: पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Death News : प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू, अवघ्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT