Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: अल्पवयीन गर्भवती माता, बाळाचा मृत्यू; प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतींमुळे बालविवाहाचे प्रकार उघड

अल्पवयीन गर्भवती माता, बाळाचा मृत्यू; प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन गर्भवतींमुळे बालविवाहाचे प्रकार उघड

विजय पाटील

सांगली : अल्पवयीन गर्भवतीच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन गर्भवतींच्या मुळे बालविवाहाचे (Child Marriage) प्रकार उघडकीस आले आहेत. मागील दोन महिन्यात पाच घटना उघडकिस आल्या आहेत. तर तासगावमधील एक अल्पवयीन गर्भवती माता आणि तिच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. (Maharashtra News)

आजही समाजात लपून-छपून बालविवाह केले जात आहेत. मिरज वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन विवाहितांमुळे बालविवाहाचे प्रकार उघडकीस आले आहेत. मागील दोन महिन्यात तब्बल पाच घटना समोर आले आहेत. विटा, तासगाव आणि नाशिकमधील एक तर रायगडमधील दोन अल्पवयीन विवाहिता प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. याबाबत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांच्याकडे माहिती दिली. पोलिसांनी (Police) चौकशी करून गुन्हे दाखल केले जात आहेत.

अन्‍य अल्‍पवयीन विवाहितांबाबत दिली माहिती

मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये कालच तासगाव तालुक्यातील एक अल्पवयीन सतरा वर्षीय गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिच्या बाळाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तसेच अन्य अल्पवयीन विवाहितांच्या माहिती रुग्णालयाने पोलीस विभागाकडे पाठवली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अल्पवयीन गर्भवतींची माहिती मिळाल्यानंतर पोलीस याबाबत चौकशी करतात. पत्नीचे आणि पतीचे आई–वडील आणि पतीवर बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death : खोलीत पेस्ट कंट्रोल केला, दारं-खिडक्या बंद; ट्रेनी पोलिसाचा गुदमरून मृत्यू, दिवाळीत दुर्दैवी घटना

Maharashtra Live News Update: पुण्यात पी एम पी बस चालकाकडून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Meghalaya Travel: पृथ्वीवरील स्वर्ग! वर्षभर पडतो पाऊस; हिरवळ, धबधबे आणि निसर्गसौंदर्याचे खजिना पाहून तुम्हीही व्हाल थक्क

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

SCROLL FOR NEXT