Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : दुचाकी विक्रीच्या तयारीत असताना चोरटा ताब्यात; चोरीच्या २१ दुचाकी जप्त

Sangli News : सांगलीच्या भिलवडी परिसरात गेल्या सहा महिन्यापासून दुचाकी चोरीच्या सत्र सुरू होते. अनेक मोटरसायकल येथून चोरीस गेल्या होत्या. दाखल तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता

विजय पाटील

सांगली : मागील काही दिवसांपासून सांगली व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. या प्रकरणी पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर पोलिसांकडून दुचाकी चोरट्याचा शोध सुरु असताना दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्यास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

सांगलीच्या भिलवडी परिसरात गेल्या सहा महिन्यापासून दुचाकी चोरीच्या सत्र सुरू होते. अनेक मोटरसायकल येथून चोरीस गेलेल्या होत्या. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता. यातच पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने कदमवाडी ते सांगलवाडी रस्त्यावरील सिद्धिविनायक चौकात विना नंबरची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पलूस तालुक्यातील बाजारातून चोरल्याची कबुली दिली.

चोरीच्या २१ दुचाकी जप्त 

सुदीप चौगुले असे या दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगलीवाडी नजीक चोरीतले दुचाकी विक्रीसाठी आले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केलं. त्यानंतर तपासात त्याच्याकडून सांगली, माळवाडी, जत, कडेगाव, पलूस, वांगी आणि भिलवडी येथून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे.

सांगली पोलिसांचा मद्यापी, हुल्लडबाजांना दणका
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणारे आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर सांगली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यात ४० ठिकाणी नाकेबंदी करून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पहाटेपर्यंत सुमारे ५०० पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात होते. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल आऊट मोहीम राबवण्यात आली. यामध्ये हद्दपार तडीपार आणि सराईत गुन्हेगागारांचा शोध घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Pizza Puff: गरमा-गरम चहासोबत बनवा झटपट पिझ्झा पफ, रेसिपी एकदम सोपी

Accident News : आधी पलटी झाली, नंतर पेट घेतला; बीडमध्ये प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; २५ प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : डोसा नंतर आता वडा गायब? पुण्यात जोशी वडेवाले यांनी शाखा केल्या बंद

मोठी बातमी! ठोकून काढू, कापून टाकू...ठाकरेंच्या दिग्गज शिलेदाराला धमक्यांचे फोन, थेट नंबरच सांगितला

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त, प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT