Swine flue news  saam tv
महाराष्ट्र

चिंता वाढली! सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे सात रुग्ण; तिघांचा मृत्यू

सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे आजवर सात रुग्ण आढळले आहेत.

विजय पाटील

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे आजवर सात रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील सहा तर विटा नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक सदृश्य रुग्णाची कोविडचीही तपासणी करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.

ग्रामीण भागातील दुधोंडी, रायवाडी, बांबवडे या गावातील प्रत्येकी एका व्यक्तीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. सध्या सावळज, रावळगुंडवाडी आणि खरसुंडी येथील प्रत्येकी एका रुग्णांवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३० जनांवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. कोविड-19 या आजाराच्या प्रतिबंध आणि नियंत्रण उपायोजना सारख्याच आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची कोविड (Covid) सोबत इनफ्ल्यूएझा तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या सर्व आरोग्य संस्थांमध्ये फ्लू सर्वेक्षणाचे काम नियमितपणे चालू ठेवण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT