Grampanchayat Election
Grampanchayat Election Saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election: सांगली जिल्ह्यातील ३८ गावचे कारभारी बिनविरोध

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या ४४७ ग्रामपंचायतीपैकी ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. अनेक (Gram Panchayat) ग्रामपंचायतीमधील ५७० सदस्य बिनविरोध झाले आहेत. (Tajya Batmya)

सांगली (Sangli) जिल्‍ह्यातील सरपंच पदाच्या ४०९ जागांसाठी १ हजार १२० तर ४ हजार १४६ सदस्य पदांसाठी तब्बल ८ हजार ६०४ उमेदवार निवडणुकीच्या (Election News) मैदानात आहेत. दरम्यान सरपंच पदाचे १ हजार ३०२ व सदस्य पदासाठीच्या ५ हजार ५६६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. उर्वरित ग्रामपंचायतसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी साम, दाम आणि दंड या भेदाचाही काही ठिकाणी वापर करताना स्थानिक नेत्यांची चांगलीच दमछाक पहायला मिळाली. बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले..

निवडणूक लागलेल्या ४४७ ग्रामपंचायतीपैकी ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले. येलूर, कोळे, धोत्रेवाडी, गौडवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडीच्या सरपंचासह सदस्य बिनविरोध झाले. याशिवाय तांदूळवाडी आणि बनेवाडीचे सरपंचही बिनविरोध निवडून गेले. शिराळ्यातील तालुक्यातील कोकरुड, शिवरवाडी, भैरेवाडी, फुपिरेचे सरपंच आणि चिखली, खुंदलापूर, वाकाईवाडी आणि शिंदेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Today's Marathi News Live: चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, नदी, नाले तुडूंब

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

SRH vs PBKS: पंजाब की हैदराबाद; कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

Railway Crime : मनमाडला रेल्वे वॅगनमधुन इंधन चोरी; सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT